मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत आंधळ्यांची शाळा

संगीत आंधळ्यांची शाळा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१-७-१९३३). संगीत : केशवराव भोळे


तू माझी अन्‌ तुझा मीच ही खातर ना जोंवरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी

गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहाते धरणी न्याहाळुनी
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनी

ओठांची थरथरते पाकळी बोल गडे झडकरी
प्रीतिची हुल फुकट ना तरी
जिवाजिवांची अभंग जडली जोड असे ही जरी
भीति मग कोणाची अंतरी

ही गाठ भिडेची तात गळ्या लाविल
हिरव्याची पिवळी पाने ती होतिल
प्रीतिच्या फुलांचा वास उडुनि जाइल

फसाल पुरत्या बसाल गाळित घळघळ अश्रुझरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी ॥


एकलेपणाची आग लागली ह्रदया
घनदाट दाटली विषण्णतेची छाया
तडफडे जिवाचे पाखरूं केविलवाणे
होत ना सहन त्या एकलकोंडे जगणे
जोडीस शोधित उदात्त अपुल्यावाणी
प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी
गुंफीत कल्पनाजाला गुंगणें
गुरफटुनि त्यात त्यात जीवाला टाकणे
रंगीत स्वप्नसृष्टिला उठविणे
ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेडया
ही सुवर्णलंका दिपवित अवघी ह्रदया
परि इंद्रजाल हे जात कधी विरुनीया
एकलेपणाची आग लागते ह्रदया

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP