मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत अलंकार

संगीत अलंकार

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२३-१-१९४४). संगीत : केशवराव भोळे


मधुर वचना मी मुकलें कां जगी ॥
सुखमय जीवन न कळे कधिं का । येईल भाळी ॥धृ०॥
अखिल जन्म शिणवुनि ही काया ।
मधुर बोल श्रवणी नच येती ।
केवि अभागी ललनाजाती ॥


अधनाही शोभेल ऐसी दीन भावना ।
विटले मन बघुनिया मलिन ह्रदया ॥धृ०॥
जरि ना वैभव लाभे मनुजा ।
अर्पियली विधिने ह्रदयिंची संपदा ।
लाजवील जी भूपतीला ॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP