संगीत मेघमल्हार
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१३-८-१९६७). संगीत : राम मराठे
१
गुलजार नार ही मधुबाला ॥धृ०॥
तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला ॥
गोड गोड बोलुनी खोडकर ओढ लावि ह्रदयाला
भ्रूधनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला
चंचल नैना सहज विंधिते चंचल या ह्रदयाला
२
धनसंपदा न लगे मला ती
मी मानितो गुण-संपदेला
ती चंचला कमला कशाला ?
वंदीन मी त्या माधवाला.
३
रंग रंग उधळीत ये आजला ‘छबेली’
सुजनांच्या अंतरात फुलवित फुलवेली
सुंदर मुख कांतिमान नार ही नवेली
रसिकमना वाटतसे आपली सहेली.
४
दुनियेच्या अंधेरनगरिचा न्यायच सारा उलटा
सती घळघळा रडती येथे, मजेत हसती कुलटा
चोर सोडुनि संन्याशाला सुळी चढविते जनता
येथे असली गरूड-भरारी, मान मिळतसे चिलटा.
५
धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी
तारितसे भाविकांस तोच चक्रधारी ॥धृ०॥
अढळ पदी अंबरात बसविले धृवाला
संकटात पीतांबर दिला द्रौपदीला
दिधली वैकुंठपेठ सकल गोकुळाला
ऐसा दातार थोर कुंज-वनविहारी. ।
होसी की भयकंपित धरसी का शंका ?
वाजतसे गाजतसे तयाचाच डंका-
‘जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी’
धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP