संगीत शहा शिवाजी
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
१४-५-१९२१. संगीत : वझेबुवा, (चाल : ठाडे भये)
१
सांडुनिया रिपुरुधिरा गे माते । न्हाणिन तव पदकमला ।
आणिन गृहि ताता ॥धृ०॥
विसर मना क्षण पडता । त्यागिन तनु इह जगता ।
गहिंवर तव मायेचा स्फूर्ति जलधारा ॥१॥
२
(चाल : देव तेथे विलसे)
देवता कामुकता रहिता । कां न होय कार्य वरद ॥धृ०॥
जी रुसते प्रेमरता । शांतकाल पाहता । कालगुणे कठिन बने ।
धांवे निजबले परि हरि भया । निरामया करित ॥१॥
३
(चाल : तोम तननन)
हा गगनमति तमारि दिनकर ।
अरुणधामि उधळित किरणराशि ॥धृ०॥
जागी हो बघ उषा विराजत । निजरमणा अरिदमना नियोजि ।
धांवत नभि धमकावित सत्ता मिरवित ।
क्लांत कांत शांताया ॥१॥
४
(राग : तिलक कामोद, ताल : झपताल, चाल : तीरथ को सब)
निरखता सुखविते भाविका तीर्थ ते ।
वासना जाळुनि शांतता अवतरे ॥धृ०॥
मुद्रा सदा शांत । प्रलय तरि मन शांत ।
करणी किती शांत । प्रखर ते भय सरे ॥
५
(चाल : अब रसीला प्याला)
खर विषाचा प्याला नरपति हा । नाग जरि पय प्याला ।
अधमचि हरि प्राणा ॥धृ०॥
नृपति यचनि नर भुलता । मूढमति अंध होत ।
खल-कृतिला मग फसला । मुकतचि निज प्राणा ॥१॥
६
(चाल : हां मोरा संरया)
हा ह्रदयिंचा जिवाचा झोला । झुलविता नवरंग सुखाला ॥धृ०॥
तोचि गडे मज त्रिभुवन भासे । झुलता जीव जिवाला ॥
७
(चाल : मिल जाना)
जन्मा यावे । गुणवंता वरावे । प्रेमे एकरूप व्हावे ॥धृ०॥
तोचि मला तारिता । तोचि मला सावरिता ।
थोर पदां सेविता । पुण्यकाल ये ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP