मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत मत्स्यगंधा

संगीत मत्स्यगंधा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१-५-१९६४). संगीत : जितेंद्र अभिषेकी


देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम ?
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम
मी निष्कांचन, निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचें प्रेम ? ॥


गुंतता ह्र्दय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी ॥धृ०॥
या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी ॥
दुर्दैवे आपण दुरावले या देही
सहवास संपता, डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज ह्रदयाशी ॥


साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची
क्रमिन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची
कैलासाचा कळस घ्वजा कौपीनाची
अढळ त्या धृवावरती दृष्टि यात्रिकाची
मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची ॥
स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे,
वाटते आता होते पतन या मनांचे
मृगजळात का भागे तृषा तृषार्ताची ॥


नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा
दिवस मावळता धाव किनार्‍याशी
तुझे चिंतन मी करीन मनाशी ।


तव भास अंतरा झाला मनरमणा मोहना
हांसती फुले भंवताली
मधुर ये फळावर लाली
स्मित साम्य तुझ्या अधरीचे मम खिळवी लोचना तव भास० ॥
वाहत ये झुळझुळ वारा
दरवळला परिमळ सारा
तव ह्र्दयपुष्पगंधाची अनुभविते कल्पना तव भास ०॥


गर्द सभोंती रान साजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ?
ती वनमाला म्हणे, “नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर
हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा”
त्यावर राजा काय म्हणाला आहे ठाऊक ? राजा म्हणाला-
‘रात्रीची वनदेवि पाहुनी भुलतिल रमणी तुला
तू वनराणी दिसे न भुवनी तुझिया रूपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसली कसली तरी ?
तव नयनी या प्रेमदेवत पसरे गालावरी
भुलले तुजला ह्रदय साजणी ये चल माझ्या घरी !”


अर्थशून्य भासे मज हा कहल जीवनाचा
धर्म, न्या, नीती सारा खेळ कल्पनेचा ॥
घ्यास एक ह्रदयीं धरुनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी पडुनी शिल्प कोसळावे
सर्वनाश एकच दिसतो नियम हा जगाचा ॥
दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा
दैवकोप येतां भाळीं सर्वनाश त्याचा
वाहणें प्रवाहावरती धर्म एक साचा ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP