संगीत राजसंन्यास
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
१२-८-१९२२. संगीत : मा. दीनानाथ कोल्हापुरे (चाल : साजन होरे)
१
साजणि बाई । सजवी मजसि करि घाई
लगीन घडि जाई । वेळ आली भरा
देव आले घरा । करा चतुराई ॥१॥
साजणि बाई । नटुनि थटुनि लवलाही ।
निघते अंगाई । राजराजेश्वरा
जवळि याहो जरा । बघिन मुख काही
साजणि बाई । चपळ पळत मन पदी
जवळि नच राहो । मंगलाचे सडे
टाकि चोहीकडे । दावि नवलाई
२
(राग : वखते तुलख देख)
भासे जनात राया । हां मनात राया
नवखंड देह नटला । दिलदार एक राया
मागे सदा फिराया । भागे अनंत काया
लागे जिवास माया । लागे परी न राया
हाती अखंड भरला । शराबे इष्कका प्याला
नाही अजून प्याला । दिलदार प्यार राया ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP