संगीत घनशाम नयनी आला
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१-१०-१९६८). संगीत : यशवंत देव
१
सुखवितो मधुमास हा
मज दावितो नव आस हा ॥धृ०॥
दाह होता विफलतेचा
गूढ माझ्या अंतरी
यामिनीच्या तम विनाशा
लाभते सौदामिनी
काय दैव विलास हा ॥
२
ही कोण कनकांगी कोण ललना
सौंदर्याचे हे आवाहन चित्राची प्रेरणा ॥धृ०॥
भ्रमर मनाचा स्मृतिसुमनी रत
मानसमूर्ती करी चित्रांकित
शांत कमलनयना
ही कोण कनकांगी ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP