मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत प्रेमशोधन

संगीत प्रेमशोधन

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१९२०). संगीत : नाटककार आणि हिराबाई पेडणेकर

१ (चाल : सखये अनसूये थांब)
ललित बघुनि तनुस काम । करिते सकल गुण विराम पुण्यधाम नटललाम ॥धृ०॥
कुसुमि खचित जणुं तरुवर । उडु विरचित गगन रुचिर चरित तेंवि सुकृत दाम ॥१॥


पसरे चोहिकडे गंध तरुंचा । गंध न ज्या मनुज करांचा
मनजोच्छ्‌वासाचे ज्या नच वारे । स्वच्छंदे वाहति वारे
परकी असतो ते मनुजखांना । पक्षी ते गाती गानां
धरणी मनुजाच्या स्पष्ट न पायीं । नभ सीधीं खंडित नाहीं
वन हे पाचूंचे रत्न धरेचे । संस्कारे भ्रष्ट न साचें ॥१॥

३ (चाल : बारी जमरिया)
घाली विधि कसा दारुण घाला । सेवित असता चित्त सुखाला ॥धृ०॥
दुष्टिने लता तुष्टचि होता । वीज पडुनि अवचित जणू जाळि तियेला
कांता समागम सुख न मिळे तो । सकल मनोरथ जाति विलयाला ॥१॥

४ (राग : बागेश्री, ताल : झंपा)
सेव्य संसार हा स्वमतिरंजना
विषय सुख लालसा ह्रदयि जरि राहिना ॥धृ०॥
पौत्रमुख दर्शनी । कामना जनकामनि
युवराजपद नलिनी शिर धराया जना

५ (चाल : जडशिले जली न्हाणिले)
जन असंभवा मानिती । परि सुसंभवा नच आदरिती ॥१॥
गदी गुटिका मणी योजिती । स्तविती हि तरि मणी प्रति ।
अगद अपाय तरि नंदिती ॥१॥

६ (चाल : वाहि तू ते)
दावि पंथा अनुसरे तया अचल भावे अंतरच न जणुं ॥धृ०॥
प्रेम भूतांवरी । बोधिसी मम जरी ।
क्षुद्र जीवार्थ तरि ही त्यजिन तनु ॥१॥
आत्मसंयमाने निज । योजिसी जरिहिमज ।
होई रामधन समज । तो शुक्रचि जणू ॥२॥

७ (चाल : राष्ट्रोन्नतिज अवनति)
हे जीवित सकल तुझ्या करीं । प्राण तुझा मम तोंवरी
अंत तुझा तो मम सुंदरि ॥धृ०॥
रविसम उज्ज्वल तव मुख ज्या लोकी राहात वितरी प्रकाश तयास ।
जाई सोडुनी तरि त्या काळी पडे महविभावरी तयावरी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP