संगीत शापसंभ्रम
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१८९३). संगीत : खुद्द नाटककार
१ (चाल : ठाऊक मजला असे ऋषीचे, धुमाळी)
नंदनवनदेवीने माझा आदर बहु करुनी
प्रशंसिले मम रूप किती हे गौरववचनांनीं ॥१॥
कोमल हस्ते नवमंजिरी ही मजला अर्पोनी
वदे करावा प्रसाद, ठेवा भूषण हे कानी ॥२॥
परिचय नव्हता अशा स्तुतीचा यास्तव तेथुनी
अधोवदन मी पुढे चाललो लज्जित होवोनी ॥३॥
२ (चाल : काय मला भूल पडली, दादरी)
मित्रा मम जन्मकथा पुशिली कां तिने
श्रवण करी सर्व कशी तृषितशा मनें ॥धृ०॥
एकलि मजजवळि उभी केंवी राहिली
कर गाला लागतांचि मधुर हासली
निघता मजवरूनि बळे दृष्टि काढिली
प्रकट करी आत्मभाव अन्य रीतीने ॥१॥
३ (साकी)
निराकार त्या निर्गुण रूपा बहुदिन धुंडित होतो ॥
सगुण अशी साकार सुंदरी दिसतां छंद सुटे तो ॥
लाभे जरि मजला ॥ मानिन मुक्तिलाभ घडला ॥१॥
४ (चाल : नोहे हा पवन जवन वारू-दादरा)
सज्ज करूनि चाप मदन येत मागुनि ॥
मार्ग दावि इंदु मला तम निवारुनी ॥धृ०॥
जरि चंचल पद चुकतें ॥ प्रीति तया सांवरिते ॥
अग्रभागिं मन पळतें ॥ करूनि दूर शंकेते ॥
उत्कंठा नेत पुढे धीर देऊनी ॥१॥
५ (दिंडी)
बहुत परिने उपदेश तुवा केला ॥ परी कामांधें म्यां न आदरिला ॥
तुझ्या स्नेहा पात्र मी नसे आता । व्यर्थ माझी वाहसी मनी चिंता ॥
६ (चाल : धन्य उषा ही बाण कन्यका, धुमाळी)
स्मरतापाच्या धर्मजलाने स्नान सचैलाचि सारोनी
कोमल कमलाचे चित्रासन रचुनि बैसलो या विपिनीं ॥१॥
चंदन चर्या, त्रिपुंड भाळी, मृणाल सूत्रा घालोनि
कदलीदल अतिसूक्ष्म वसन हे पांघरलो स्कंधावरुनी ॥२॥
मुक्तावलिची जपमाला ही लक्ष लाविले त्वद्ध्यानी
अनन्य गति मी शरण रिघालो इच्छा पुरवी येवोनी ॥३॥
७ (चाल : वृक्षवेल या दोहोंची-पंजाबी)
या तरूणा ताबूल द्यावया लाज वाटते ॥धृ०॥
अल्पहि नाही परिचय त्याचा प्रथम आजचि पाहिला
म्हणुनि मना धीर होई; तूच गडे दे हा त्याते ॥१॥
८ (चाल : पिलू, चाल : व्यर्थ आम्ही अबला-पंजाबी)
मधुर किती ॥ कुसुम गंध सुटला ॥धृ०॥
त्या लोभे हे मधुकर पळती । गुंजारव उठला ॥१॥
सकल फुलांचा परिमल सारा । काय एकवटला
साच असावा सुरलोकीचा ॥ भूवरि हा कुटला ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP