मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत देवमाणूस

संगीत देवमाणूस

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२५-८-१९४४). संगीत : छोटा गंधर्व


सुखवीत या संसारा, जगती मेळ जिवाचा प्यारा ।
ह्रदय ना जरी मिळतां ह्रदया, जात खचित प्रीति विलया ॥


छळि जीवा दैवगति अती ॥धृ०॥
शिरिं घाली घाव कुठार ती
शशि-सूर्य़ गगनिं प्रकाशती
परि राहु-केतु त्यां ग्रासती
जन जगी तशीं, दु:खे साहती


चांद माझा हा हांसरा, नाचवी कसा प्रेमसागरा
प्रीतलहरी ये भरा ॥धृ०॥
गुण कनकाच्या नव कोंदणीं गे
शोभसी सखे, तूं हिरा ॥


दिलरुबा मधुर हा दिलाचा
छेडित राग गोड प्रीतिचा ॥धृ०॥
करित साथ, संसार-संगीता
नाद सुखद तव ह्रदयाचा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP