मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत पाणिग्रहण

संगीत पाणिग्रहण

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(११-१०-१९४८)


उगवला चंद्र पुनवेचा
मम ह्रदयी दरिया । उसळला प्रीतिचा ॥
दाहि दिशा कशा खुलल्या
वनीं वनीं कुमुदिनी फुलल्या
नववधू अधिर मनीं जाहल्या
प्रणयरस हा चहूंकडे वितळला स्वर्गिचा ॥


प्रिती सुरी । दुधारी !
निशिदिनि सलते जिव्हारी !
सुखवी जिवास भारी !
मधुर सुखाच्या यातना,
व्याकुळ करिती सतत मनाला !
अमृताहुनी विषारी !


कळा या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?
उरी या हात ठेवोनी उरीच्या शूल का जाई ?
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ?
कशी साहू पुढ मागे जिवाला ओढ लागे,
तरातर काळजाचे हे तुटावा लागती धागे !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP