मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत अमृतसिद्धी

संगीत अमृतसिद्धी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२६-१०-१९३३). संगीत : मास्तर कृष्णराव


(रग : भीमपलास, ताल : झपताल, चाल : खानदोरे)
तूंचि दिव्यांगना भारिसी जीवना ॥धृ०॥
तव हा मुखचंद्र । उदित मम मंदिरी ।
जणु भाग्यपूर्णेंदु । जिवाचा उरेला ॥


(राग : जिल्हा पहाडी, ताल : कवाली, चाल : फूल मंगावो)
गांजिसी वाया दीन जना या । जीवन मम तव छाया ॥धृ०॥
नयन-तरंगी जीव तरंगे । नाचत डोलत ही काया ॥१॥
अधरसुधा ती अमृत भासे । प्रेमपिपासा शमवाया ॥२॥


(राग : पिलु, ताल : कवाली, भजन)
तुम बिन मेरी कोन खबर ले । गोवर्धन गिरिधारी रे ।
मोरमुकुट पितांबर सोहे । कुंडलकी छब न्यारी रे ॥धृ०॥
खडी सभामो द्रौपदी ठाडी । राखो लाज हमारी ।
मीराके प्रभु गिरिधर नागर । चरनकमल बलहारी रे ॥१॥


(राग : दुर्गा, ताल : केरवा)
पायोरी मैने रामरतन धन पायो ।
वस्तु अमोलिक दीन्ही मेरे सद्‌गुरू । कृपा करी अन पायो ॥१॥
जनम जनम की पुंजी बांधी । जगमे सभी खो वायो ॥२॥
सतकी नाव खेवटीया सदगुरू । भवसागर तर आयो ॥३॥
मीराके प्रभु गिरिधर नागर । हरख हरख जस गायो ॥४॥


(राग : शंकरा, ताल : त्रिताल, चाल : जियामे बसेरा)
कटु योजना ही । विधिची । अजि साहू कैसा । मज बल ना ॥धृ०॥
रतिसम नाही । हीच दुष्ट घटना ॥


(राग : भीमपलास, ताल : त्रिताल, चाल : कवन बताये)
गमते सदा मजला । द्वारका वंद्य । प्रभुच्या पदांबुजें जगीं ।
जी होत धन्य ॥धृ०॥ भासत ती मूर्ती बघतां ।
हा त्यजोनी । स्वर्गीचे जणुं सिंहासन । प्रभुराज । अवतरला ॥


(राग : नंद, ताल : झपताल, चाल : धुंडा बन)
धन्य तूचि कांता । गमसी करिता क्षमा कांता ॥धृ०॥
नवजन्म घेतां । त्वदीय सहवास लाभो । दुजी नच वांछा ॥


(राग : लाहोरची पहाडी, ताल : केरवा, चाल : मोदन करत)
धावत येई सखया । यदुराया ॥ नातरी महिमा जाईल विलया ॥धृ०॥
बघ आचरिला । धर्म जगी मी ।
शिखविलासि जो । तूचि कासया ॥१॥
जरि शासन मज । लाज तुला ती ।
ब्रीद राख निज । समयी अशा या ॥२॥


(राग : मालकंस, ताल : त्रिताल)
प्रकट भयो भगवान । प्रभुजी । नंदजीके घर नौबत बाजे ।
टाल मृदुंग और तान । प्रभुजी ॥१॥
सबही राजे मीलन आये । छोड दिये अभिमान ॥२॥
मीरा के प्रभु गिरिधर नागर । निसदिन धरि जो घ्यान ॥३॥

१०
(राग : बागेश्री, ताल : एकताल, चाल : कमलकोमला)
धवल लौकिका । मलिन करित मम जनता ॥धृ०॥
विमला मम कांता । जी जगता दे शुचिता ।
पतियश नाशिल ती का ॥१॥

११
(राग : जयजयवन्ती, ताल : त्रिताल, चाल : सांवरो नही)
लहरी अतां । सुखाच्या । करिती तनू रोमांचिता ॥धृ०॥
सदनी येतां । जिवलग सखया ।
रमणि मनी ये । हीच प्रफुल्लता ॥१॥

१२
(राग : भैरवी, ताल : त्रिताल, चाल : ‘कान कुदर’)
ही समज तव कुटिल चतुराई । विदित झाली । आज नाथा ॥धृ०॥
मजसि अबोला । धरुनी लटका । मनधरणी मीच ती करावी ।
हा तव हेतु । उचित नच आतां ॥१॥

१३
(राग : अडाणा, ताल : त्रिताल, चाल : आइरे कर्करा)
कांता वंचिता निज पतिता संसारी । कठिण खडग न्याय करिल ।
अजि करि धरित ॥धृ०॥
सदनीं काय वैर्‍यांना ।
देइना ठाव कुलांगना । कुलांगारिणी ती पतिता ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP