मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत आशा निराशा

संगीत आशा निराशा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


१९२३. संगीत : मास्तर कृष्णराव, कवाली, ताल : त्रिवट


हजरत सलाम घ्यावा । मजला निकाल द्यावा । देवा ॥धृ०॥
बागबगीचा फळा फुलांचा । कोणी काय तुडवावा । देवा ।
जोड बाळिचा दसलाखाचा । सागरात हरवावा । देवा ।
मायपित्याचा जीव जिवाचा । कालपाशि गुजरावा । देवा ।


(राग : पहाडी, ताल : कवाली)
नाचत रसा रसिका । छुम छुम जलि नौका ॥धृ०॥
प्रणयमहोत्सवी । ललित रागिणी । मिरवित प्रीतिं पताका ॥
उधळीत मृदु कलिका ॥१॥


(राग : धानी, ताल : त्रिवट)
मान्य कांत वरिला हा । रवि राज्य करित ।
मम मनिं निशिदिनि तो हा ॥धृ०॥
धन्य हंसिका । मौक्तिक वांछित ।
खुलवि फुलवि शशि तारका ॥१॥


(गझल, ताल : कवाली)
तात करीं दुहिता विनाश । बल द्याया वेग । माते धांव गे ॥धृ०॥
अर्पुनि म्लान मुखी । चुंबनधारा । घे ह्रदयीज फुलवी जिवाला ।
तव माया वेगे । माते धांव गे ।


(राग : पिलु, ताल : कवाली)
दिलरुबा हा या जिवाचा बाद साजिरा हमिरा हा ॥धृ०॥
पाखरा या । प्रेमा गाया स्कंधी ह्रदयी घ्या ।
खुल्या दिलाचे पडदे खोला । कालि कालि या । गडे या-या ॥


(पद-राग : बागेश्री, ताल : त्रिवट)
पाजुनिया सदया सुधारस । गरल बिंदु नच द्या या ॥धृ०॥
सुरुचिर बाला । करि सुममाला । अघटित लीला ।
प्रकटवि सुख तिज वाया ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP