संगीत जयजय गौरीशंकर
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१४-८-१९६६). संगीत : वसंत देसाई
१
सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा
‘जय परमेश्वर, गौरीशंकर; जय गौरी-रमणा’ ॥धृ०॥
भक्तिरसाची निर्मळ गंगा
वदे खळखळा धवळ-तरंगा-
‘जय मंगल-सदना ॥
शंकर-डमरू डम बोले-
शिव-रंजनि । गिरिबाले !
चरणीं तव नत झाले; सुरवर करिती तव भजना ॥
२
भरे मनांत सुंदर तुझीच मूर्ती श्यामला ।
छंद लागला जिवास धुंद जो करी मला ॥
लाभतां तुझ्यापरी सुकांत कृष्ण-सुंदरी ।
नको म्हणेन गौर ती अप्सरा मनोहरा ! ॥
खेद न करि श्यामले ! सावळाच रंग खुले ।
पहा, निशाच शोभवी सतेज चंद्र हांसरा ।
कोकिळेस लाभली सुरस्य गीत-माधुरी ।
गौर गाल भूषवी सुरेख तीळ साजरी ।
३
निराकार ओंकार साकार झाला
तयें विश्वसंसार हा रंगविला ॥धृ०॥
दिलें रम्य चांचल्य सौदामिनीला
दिलें रम्य मांगल्या मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत सार्या जगाला. ॥
४
नारायणा, रमा-रमणा ।
मधुसूदना, मनमोहना, करुणाघना ॥
धांव आतां श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा ।
तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा ।
दे प्रसादा व्यंकदेशा ! जगताच्या आनंदा ॥
५
सावज माझं गवसलं
सावज माझं गवसलं ॥धृ०॥
अरे अरे सावजा विसरूं नको ।
उगाच गमजा करूं नको ।
तीर सरासर, माझा सुटतां ।
कुणीच नाही रे बचावलं ॥.
लखलख लखलख माझा बाण्
करिल तुझी रे दाणादाण्
मदन-धनूच्या बाणालाही, जयानं चटकन् हरवलं ।.
अशी तशी मी नसे कुणीऽ
मी वनराणी रूपखनीऽ
रसराजांनी, नवीन यौवन, तनमन माझं सजवलं ।.
पार्वतीच्या शंकरानं
गिरिजेच्या गिरीशानं
दुर्गेच्या ग दुर्गेशानं
माझ्यावरी कृपा केली, म्हणून मजला यश आलं ।.
६
छंद नसे हा भला, प्रियकरा
छंद नसे हा भला ॥
प्रणयाचा सारीपाट फसवा, झटपट हा उचला ॥
दोन घडीचा डावऽऽ करील पाड ऽ व सोडा याची हाव ।
होउनिया नि:संग भजा श्रीरंग
नाही तर, कटेल अपुला गळा ॥.
कशि नाचे छमाछम्, मत्त मयूरी ॥धृ०॥
दरि दरी झंकारित करि ही मदनधनूची दोरी ॥.
निर्झर कलकल आज घुमवि पखवाज
गंधित हा वनात करी मुरलिची साथ
वदत महेश्वर, “अशि न पाहिली, नर्तन कुशल किशोरी”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP