मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत देव दीनाघरी धावला

संगीत देव दीनाघरी धावला

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.



ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी ।
भेटीत रुष्टता मोठी ॥

त्या कातरवेळा थरथरती कधीं अधरीं ।
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी ॥
कितिदां आलों-
जमलों-

रुसण्यावांचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी ।
भेटीत रुष्टता मोठी ॥

कधीं तिनें मनोरम रुसणें । रुसण्यांत उगीच ते हंसणें ॥
म्हणून तें मनोहर रुसणें । हसणे रुसणें-रुसणें हसणें ॥
हंसण्यावरती रुसण्यासाठी । जन्मजन्मींच्या गांठी ॥
भेटीत रुष्टता मोठी ॥

कधी जवळ सुखाने बसलों ।
दु:खांत सुखाला हंसलों । कधीं गहिंवरलों-
कधीं धुसफुसलों-सागरतीरीं आठवणींनी-

वाळूंत मारल्या रेघा । जन्मासाठीं जन्म जन्मलों ।
जन्मांत जन्मली न गट्टी । भेटींत रुष्टता मोठी ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP