मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत चित्रवंचना

संगीत चित्रवंचना

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


१९१७.


(राग : भैरवी, ताल : त्रिवट)
नृपति-कन्या कां वाटे अनुरूप कांता ॥धृ०॥
गरिब मी दुबळी बळे । मज शोकि लोटिले ।
वचन तसलें । मजसि दिधले ॥
उचित गमले । असो आता


(राग : जीवनपुरी, ताल : त्रिवट)
मंजुळ किति मंथरगणि नुपूरश्व हा अनुताले ॥
जणु नीलकंठा नृत्यागम सांगे ॥धृ०॥
हा दूर चतुर तर कांता नियोजी ॥
लागुनी श्रवणा सुचवी आराधन माते ॥१॥


(राग : सारंग, ताल : दादरा)
मानस का हे । संशय मम जयि घेई ।
अधीर का होई । तेज माझा सुरा ॥
वीर विजयी खरा । तरुणा भारी लोळवि पायां ॥धृ०॥
भुलवू कुमारा । संभ्रम मम सारा ।
मदनलीलापसारा । वरा हा । नेत्र माझा सुरा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP