मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत विक्रम शशिकला

संगीत विक्रम शशिकला

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१८९१). संगीत : खुद्द नाटककार

१ (चाल : जा हरीला शरण मानवा)
मंदगा लावु नका कर दूर हा करा, तुम्ही दूर सरा ॥
खराच नसतो धीर नरा ॥ कर ॥ अंत्रा ॥

विक्रम :--- जीवन केवळ तुझ्या करीं गे ॥ असुसुनी कां ही करीसी ढोंगी ॥ दाऊं नको पुढती सोंगे ॥

शशिकला :--- काही तरी मनि न्याय धरा ॥ स्वकुलास स्मरा ॥ कर ॥ खराचा ॥

विक्रम :--- सुरासुरांही अंत नसे गे ॥ सुकीर्ति ही तर कधी न भंगे । नाम जगत्रयिं गाजतसे गे ॥

शशिकला :--- धुंदी आतां किमपी उतरा । नय हा न बरा ॥ कर ॥ खराच ॥

विक्रम :--- नरास भाग्यें भूषण येतें ॥ स्त्रीचरित्र्यापुढति न चढतें ॥ स्मरव्यथेने धुंदी चढते ॥

शशिकला :--- जीभ जरा आवरुनि धरा ॥ मज हा नटवरा ॥ गमतो न खरा ॥ खराच ॥

विक्रम :--- उपवन सोडुनि वन सेवाया ॥ इच्छि न कोणी कामी वाया ॥ अजुन कशी तुज येइ न माया ॥ जाहली वरा गौरिहरा ॥ अनुरूप बरा ॥१॥

शशिकला :--- परि ते विसरा ॥ खराच ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP