मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत वंदे भारतम्‌

संगीत वंदे भारतम्‌

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.



वाजे नभीं चौघडा ! घडघडा ।
गगनीं तिरंगी फडकत झेंडा ॥धृ०॥
समरसमयीं हा वाजत डंका
मायदेश तुज मारित हांका
झुलत आघाडीस हा जरिपटका ॥१॥


भारतभूमि नाचवी ज्याच्या प्रेमाच्या सिंधु, तोच खरा हिंदु !
हिमालयाचा भव्य मुकुट तो शोभवि शीर्षाला,
गंगायमुना पवित्र सरिता भूषविती प्रीतीचा सिंधु तोच खरा हिंदु ! ॥१॥
जिथे निनादे ऋषीश्वरांची अजुनि वेदवाणीं,
वीरवरांच्या पराक्रमाची अखंड जी खाणी,
आर्यभूमि ती नाचवि ज्याच्या भक्तीचा सिंधु तोच खरा हिंदु ! ॥२॥
सुवर्णभूमी म्हणुनि जियेची त्रिखंडभर कीर्ती,
अर्ध्यापोटी तिथे झगडती आज तीस कोटी,
त्या भूमीतिल गरीब लेकरा जो मानी बंधु ! तोच खरा हिंदु ! ॥३॥
दास्यमग्न ही जरी आजला आर्यांची भूमी
चिंतितसे परि रात्रंदिन जो तिला मातृभूमी
सिद्ध तिच्यास्तव सांडाया जो रक्ताचे बिंदु तोच खरा हिंदु ! ॥४॥


किती मोहक भाससी राया
भुलविते मला तव माया
बघ नाजुक ही माझी काया
फसवितोस का मग वाया
मी नवथर तूच कन्हैया


नवयुगाचा हा चौघडा
उठवि पहा या नवभारताला,
स्फुरवित नवतरुणाला !
तळपत हा रवि-स्वातंत्र्याचा !
उगवत काळ आज तरुणाचा !
दिपवित जगास या काला !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP