संगीत वधु परीक्षा
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(११-१०-१९२८). संगीत : वझेबुवा
१ (राग : देस, ताल : त्रिवट)
सत्पात्र हा ललनाकपोल । अरसिक नर वरि चढविन नग बहुमोल ॥धृ०॥
स्मित चतुर करि परिसुनी सुकाव्या
करि वर्णविकारिच भाव खुला अबोल ॥१॥
करुणह्रदय शमवित नरपिपासा
वितरोनि सुधापम चुंबन हर्षलोल ॥२॥
२ (राग: मांड, ताल : केरवा)
मानिले पित्याहूनि मी । आपणांसि भावे । हे काय न ठावे ॥धृ०॥
गणियले सुतेला । ही तशीच बाला । अदया मतिला अजि कां करावे ॥
३ (ताल : कानडी - त्रिवट)
जिव बावरा । स्थिर ना जरा । नच आसरा । आता खरा ॥धृ०॥
अनुकूल कार्या । नृप होई का या । भीति माझ्या छलि अंतरा ॥१॥
४ (राग : सिंधुरा काफी, ताल : दीपचंदी)
बाह्मण्य सारों । रमले तुझे ठायी । धरुनि मधुर रूप । अतितोषदायि ॥धृ०॥
ज्ञानार्कतेजा शमचंद्रिकाही । सह नांदवाया ।
धरिसि स्वदेहीं । सत्यासिधाराव्रत तेवि पाही ।
मृदुह्रदय नवनीत । तव मूर्ति वाही ॥२॥
५ (राग : जिल्दा, ताल : केरवा)
जिव हा तोषला । परिसुनी सुधोपमा बोला ॥धृ०॥
धन्य मी लोकि बाला । सुदिन उदेला ।
हर्षे हा आत्मा न्हाला । पुलके देह हा दाटला
मन भ्रांतचि हो या काला ॥१॥
६ (राग : मालकंस, ताल : त्रिवट)
प्रेमा तिच्या उपमा नोहे । भूमीमाजी हेमाविना ॥धृ०॥
ते प्रेम साच चमके संकटि । अग्नित हेमहि लपतांना ॥१॥
७ (राग भैरवी, ताल : एक्का)
ह्रदय जाळि तीव्र घोर चिंता । आतां । लागे या मनि तळमळ ॥धृ०॥
मानीना नेत्र असुनि । आप्त मला नृप म्हणोनि ।
न्याय अंध का मानिल ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP