संगीत देहूरोड
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१९४०)
१
सखि भावगीत माझे तुजसाठीं गायिले
तू नाहिं ऐकियेले ।
ह्रदयांत वेदनांची सरिता अखंड वाहे
तीरीं तिच्या बसोनी तुजसाठिं गुंफियेले
तू नाहि ऐकियेले ।
सौंदर्य तारकांचे नव तेज चंद्रिकेचे
उकलोनि मृदुकरांनी तुजसाठिं दावियेले
तू नाहि पाहियेले ।
गेले सखे विरोनी ते गीत अंतराळी
परि त्याचिया स्मृतीने होतात नेत्र ओले
तू नाहि पाहियेले ।
गेले सखे विरोनी ते गीत अंतराळी
परि त्याचिया स्मृतीने होतात नेत्र ओले
तू नाहि पाहियेले ॥
२
गातो नाचतो आनंदे
वेडा झालो मी तव छंदे
गाई ओविया पंढरिचा देव
आमुचा तो जीव पांडुरंग
आतां दृष्टीपुढें ऐसा ऐसाचि तू राहे
जो मी तुज पाहे पांडुरंग ॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग
गाऊं गाऊं गोड हरिचे गीत ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP