संगीत भूमिकन्या सीता
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
२८-२-१९५८. संगीत : व्ही. जी. भाटकर
१
मी पुन्हां वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठांत घोळविन रामप्रीतिचीं गाणी ॥धृ०॥
पुसतील कुशल मज लता, कर्दली, केळी
मोगरा, मालती फुलतिल भलत्या वेळी
देईल साद मज दुरुनि श्यामाराणी ॥१॥
देतील ओंजळी भरून जांभळी, बोरी
येतील पाठसें दबत हळूं शेजारीं
चुंबीन त्यांस मी भरविन चारापाणी ॥२॥
पाहीन दुरुन मी यज्ञधुमाची रेखा
जाईन तपोधनि अवचित कोण्या एका
तरुतळीं बसुनिया ऐकिन मुनीची वाणी
मुलींची वाणी ॥३॥
२
मानसी राजहंस पोहतो । दल दल
उघडित नवनलानें कमलवृंद पाहतो ॥ मानसीं ॥धृ०॥
नील जलावर धवल विहग तो, जलवलयांसह खेळ खेळतो
श्रीरामाच्या वक्षस्थळिं जणूं, मौक्तिकमणि डोलतो ॥१॥
दिवास्वप्न कीं भास म्हणूं, का वनवासाचा घ्यास जणूं हा
मनीं वसें तें नयनांपुढतीं, सजिवपणें रेखितो ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP