मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत नंदकुमार

संगीत नंदकुमार

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१९२५. संगीत : मास्तर कृष्णराव


(राग : जिल्हा काफी, ताल : पंजाबी, चाल : चलो हटो बय्या)
वरित हा देवांच्या ह्रदया । मजला गणि जो गुरुसम वायां ॥धृ०॥
विपदि घोर हा मज परि पाही । तरि ये खरता कृतिपरा तया ॥


(राग : यमन, ताल : एकताल, चाल : सैयां तुम बोल)
कुसुमायुध चारुकांत । निर्मी आमोद शांत ।
परिनाशा त्या संगे । कीटकासि मूढ सृजित ॥धृ०॥
अखिल भुवन भूषणा । प्रेरि जगति नरवशासि ।
दनुज तया, का नकळे । नाशाया मग निमित ॥


(राग : पहाडी, ताल : केरवा, चाल : करम दिया मोरि)
भाग्यवती भुवनात ललना । तुजसम बहु धन्या दिसेना ॥धृ०॥
निरखोनि जया विश्वसुधा वरि । दे तुज तो स्वुमना समाना ॥
चिर सहवासा घे रमणाच्या । निरवधि सुख सदना वरेण्या ॥


(राग : भीमपलास, ताल : एकताल, चाल : लचक लचक)
तिमिरपटल भार विपुल करि वसुधा व्याकुळ हा ॥धृ०॥
अरुणोदय कांत शांत वांछि भुवन आर्त महा ।
अमर विभवि उदयाचलि त्या विलसे कृष्ण अहा ॥


(राग : दरबारी कानडा, ताल : त्रिताल, चाल : जानकीराम राजाकी)
मानसा या देहा । तुच स्वामिनी भुवनीं एका ॥धृ०॥
जया तव करि दिले ते । ह्रदयचि चिरिसी हाते ।
ही कृति नेइल नरका ॥


(राग : करहरप्रिया, ताल : त्रिताल, चाल : सीतापते भज)
तारावया जन पातला हा । परि शल्यसा हो कुजनांस ॥धृ०॥
सुरनंदना सुखदा त्यजोनी । अध सेविते नरकवास ॥


(राग : देसकार, ताल : त्रिताल, चाल : सबरस आकर दे)
अवधि न भाग्य बलाते । द्वेषमात्र मलिनगात्र हतललना
अमराधिपा मधुरा ॥धृ०॥ योगे स्वातिसमयी धनजले
शुक्तिपुटीं जन्मती सतेजा मुक्ता प्रखरा ॥


(राग : भैरवी, ताल : त्रिताल, चाल : तुम जागे कौन)
नच मानसा आशा प्राणेशा । आता अन्या या ॥धृ०॥
विश्वमंगला प्रिय कृष्णाला । साह्य करी मिळो प्रेमे आपुल्या ॥


(राग : मांड, ताल : पंजाबी, चाल : कोन कोन कोन गुबन)
त्यागभाग सांग तव दीन कोणता ? ॥धृ०॥
पूर्ण विरागी निजसुख भोगी । परानुरागी होसि देवता ॥
विश्वपित्यासी चिंता न अशी । गणि सृष्टिशी । तोहि भिन्नता ॥

१०
(राग : तिलक कामोद, ताल : झपताल, चाल : सकल दुखहरन)
दहन खर हरया । महाघोर रणरणक करित कृष्णासि
बहु आकुल भावमा सभय ॥धृ०॥
आधार विश्वासि । मंगल सांधनासि ।
विकृति होतां तथा । आगत हा महाप्रलय ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP