मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत शिक्काकटयार

संगीत शिक्काकटयार

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


४-६-१९२७.


(राग : मियाचा मल्हार, ताल : एकताल)
मधुप हा पिता कसा सुवासा । कमलिनीपाशा फसे अधिरसा ॥
वांछिता विलासा ॥धृ०॥
ह्रदयिं मदन संचरला । व्याकुळ करि जीवाला ।
तनु कापे थर थर थर । मनहंसा प्रणय सुख पिपासा ॥१॥


(राग : कर्नाटकी, ताल : त्रिवट)
ललना प्राणिग्रहणा या जना । आलिंगना प्रियांगना ॥धृ०॥
नजर गहिरी हनु गोजिरा । गाल लाल सजतहि संगरा
व्हाया जाया जना या ॥१॥


(राग : जयजयवंती, ताल : त्रिवट)
मंगल ते प्रियधाम । या मना । ममता निर्झर ॥
मातृह्रदय ते । चुंबचुंबिता ये अंगाई ॥धृ०॥
वदनसुमांचा चुंबन मेवा । भान हिरावी । मोद माईना ॥


(ताल : केरवा)
माता वचन दे सदा देशा । तुडवी पकरीय पाशा ॥
राष्ट्र्धर्म नव जीवशिवाचा । ऐक्याविना न आशा ॥धृ०॥
बा महाराष्ट्रा । जागा होई ग्वाहि देत तुज माय भवानी ॥
स्वातंत्र्या साधाया देशा । ऐक्याविना न आशा ॥१॥


(राग : सुहाकानडा, ताल : त्रिवट)
तुझ्याविना भाव ना या मना । राजस माना कामुकता ना ॥धृ०॥
मदिय प्राण उचित दान । प्रिया आस शमनि कां न ॥१॥


(राग : बागेशश्री, ताल : त्रिवट)
घुमत घ्वनि कां हा । गे प्रणयिनि मम मनी ।
गा प्रिया जा राया । अमरपद घ्याया समरि या ॥धृ०॥
नाचत पूर्वा जाया जिवाची । उधळि स्मितरंग करि गुंग ।
रविला प्रिय रणिं न्हाया ॥


(राग : देसकर, ताल : झपताल)
सुखद जगि राजा । शास्ता बलवान ।
जो झटत दिन रात । उचित जन काजा ॥धृ०॥
या रणी साह्यार्थ । हा बलि महाराष्ट्र ।
राजकाज तरवार । कां न यश मम ध्वजा । काजा ॥


स्वार्थी पसारा सारा जगी या । रवि चंद्र तारा ।
उडति त्या अमरा ॥धृ०॥
घनदाट अंधार पसरे निराशा । झुंजार वारा न जीवा निवारा ॥


(राग : भैरवी, ताल : त्रिवट)
पाहिन मी सखया जिवा या । वाहिन काया त्या झुलवाया ।
रिझविन प्रेम भरे मम ह्रदया ॥धृ०॥
रणीं चमकला राजस राया । शाहू छत्रपति हा या ।
नाचति या वृत्ति प्रियासि गावया ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP