प्(२-१२-१९७२). संगीत : नीलकंठ अभ्यंकर
१
टुमदार, कुणाची छान, नव भरज्वान, पुसा आली कुठून ?
स्वरूपाचे तुटती तारे, कडारेकड विजवा पडतिल तुटून ॥
पान खाऊन ओठ करि लाल, अंगावर शाल, झळकती चुडे
गजगती चाले हळू. उरि ग जोवन उमटले हुड-
वय अटकर बांधा लहान
हरपलो पाहून भूक-तहान
कर अर्पण पंचीप्राण-रणी ग जाऊ कटून ।
गगनात चांदणी ठळक, मारिशी झळक, उभि ग अंगणी
किती नटुन थटुन मारिशील छनाछन, नैनाच्या संगिनी
झालो घावविण घायाळ
झोंबला विखारी ब्याळ
जणुं टाहो करि कोयाळ
तूं न कळे घालशी माळ-कोणाला गे उठून ?.
२
कशि केलीस माझी दैना । मला तुझ्या बिगर करमेना ।
घडिभरी माझिया मना, चैन पडेना ॥धृ०॥
तू राघु तुझी मी मैना । माझं रूप बिलोरी ऐना ।
अंगी इष्काचा आजार, करी बेजार, कमति होई ना ।
तू हकीम होउनि यावे । एकांती औषध द्यावे ।
दे चुंबन साखरपाक, मिठीचा लेप, मजसि साजणा ।
अरे मनमोहना ।
३
गुन-सागर गंभीर दयामय
श्री गुरुदेव महान् ।
सूर-ताल-लय-तान-गान के
किमयागार सुजान !
अनुसाशन-पालनमें मन जो
उनका शैल-समान !
बही भरा है प्रेमभावसें
कोमल फूल-समान !!
४
एकलीच दीप-कळी मी अभागिनी
स्नेहाविण केवि जगू विजन-काननी ?
माझिया न संगतीस या इथे कुणी
प्रेमास्तव तळमलते मी वियोगिनी !
देवा ! मी ओवाळू प्रीतिने कुणा ?
कोणाला सांगावी मूक वेदना ?
काहीही अर्थ नुरे रुक्ष जीवनीं, !
५
रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही ।
रे तुझ्यावाचून दुनिया दीन ही होणार नाही ॥
गर्व तव हा व्यर्थ, मी केले असे, केले तसे
चोंच देई पाखरांना, तोच चारा देतसे
एकही घरटे तुझ्याविण मोडुनी पडणार नाही !.
तानसेनावाचुनी, किंवा सदारंगाविणा
काय मैफल या जगाची रंगली केव्हाच ना ?
कोण तूं ? तुजवीण वीणा बंदही होणार नाहीं !.