मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी

संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.



निघालें आज तिकडच्या घरीं ।
एकदांच मज कुशींत घेई

पुसुनिं लोचनें आई,
तुझी लाडकी लेक आपुले
घरकुल सोडूनि जाई !
तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी ॥१॥ निघालें आज०

पडतें पाया तुमच्या बाबा
काय मागणें मागूं
तुम्हीच मज आधार केवढा
कसे कुणाला सांगू !
या छत्राच्या छायेखालून सात पावली करी ॥२॥

येते भाउ विसर आजवर
जें काहीं बोललें,
नव्हती आई तरिही थोडी
रागावुन वागलें !
थकलें अपुले बाबा आतां एकच चिंता उरीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP