संगीत मीरा मधुरा
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(६-५-१९६८). संगीत : जितेंद्र अभिषेकी
१
अशी सखी सहचरी प्रणयिनी । शिवसुंदरी मोहिनी
वरिन मी तीच जन्मजोगिणी
वीज कडाडे नयनी एका
दिठित दुसर्या शरदचंद्रिका
सूर जिचे मज पाजाळित जाती आणि फुले कमलिनी ॥
बिल्वपत्र राउळात
रातराणि काळजात
गीत मदिर पर भाव मधुरतर, अशी दिव्य योगिनी ॥
२
चंद्र हवा धनविहिन मला
शाम घनांकित होता तो शूल
व्यथेचा गगनास ॥धृ०॥
विमल तव देई सहवास
जीवनात कल्पकता बहरण्यास
३
स्वप्नांत पाहिले जे ते राहू देत स्वप्नीं
ते सत्य सप्तरंगी मी ऐकिले सुरांनी
मी पाहिले दिठिने लावण्या एक दैवी
त्या शामसुंदराला जी धुंद करिल देवी
परि आस या मनाची हा एक घ्यास देवा
माझे मला मिळावे माझे मला मिळावे
लावण्य हेच दैवी माझे मला मिळावे
स्वप्नात पाहिले जे सत्यात मूर्त व्हावे
४
आनंद सुधा बरसे, झाली धुंद अमृतघन बरसात
चरणी पावन फुले स्वर्ग या विजनात
रसमय मंजुळ गीत मानस भरे
कमलदली जशी पुनत रात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP