मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
रुक्याचीं सोयरीं सारीं, फ...

गज्जलाञ्जलि - रुक्याचीं सोयरीं सारीं, फ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


रुक्याचीं सोयरीं सारीं, फुकाचा सोयरा कोठे ?
दुकाळीं सोय जो पाही जिव्हाळा तो खरा कोठे ?
सरींनी श्रावणीं वाणी भरूनी वाहती वाया.
टिके जो ऐन वैशाखीं ऊमानी तो झरा कोठे ?
विदेशी रङिगबेरङगी फुलांचे ताटवे जङगी,
अनङगी बाण साधा तो स्वदेशी मोगरा कोठे ?
असेना कान्ति सोन्याची ?! टळेना धूळ होण्याची.
धुळीचें जी करी सोनें गुणी ती हृद्धरा कोठे ?
घडीची सुप्रसिद्धी ही कुणाही छापखाना दे;
तपाच्या राशिला भाळे प्रथा ती अप्सरा कोठे ?
गरीबी मोकळीकीची रुदेना चैनबाजाला;
विचारी बोलका राघू, - रूचेना चैनबाजाला;
मिळूनी वृत्ति राजाची शमेना आग हो ज्याची.
- परन्तू हाय !  राखेचा मुखीं त्या तोवरा कोठे ?
रमावें आपुल्या कामीं, न व्हावें दास वा स्वामी,
जगाच्या विस्मृतारामीं अशांना कोपरा कोठे ?
वरूनी लाथ साहीना, तशी खालीहि झाडीना.
हिशेबी चोख जो राही, - चहा त्या नोकरी कोठे ?
भरेना पोट कष्टोनी, न विद्या - धूर्तता दोन्ही;
ज ज्यांचा कायदा वाली अशांचा आसरा कोठे ?
दिखाऊ शब्दशूरांचे थवे हे शुभ्रपोशाखी,
लढाऊ घ्येयवादी तो जगाचा मोहरा कोठे ?

२६ मे १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP