गज्जलाञ्जलि - कृतीने तत्त्वकैवारी, महात...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
कृतीने तत्त्वकैवारी, महात्मा तोच या कालीं,
जनांचीं सङकटें वारी महात्मा तोच या कालीं.
जयाचें प्रेम हें केवी जगाला आकळी खेवीं,
झिजूनी जन्म - भू सेवी महात्मा तोच या कालीं.
जयांना धर्म - पुण्डांनी बळाने डाम्बिलें दास्यीं,
घरी जो त्यांस पोटाशी महात्मा तोच या कालीं.
पडूं द्या भार त्या स्कन्धीं, न लोपे हास्य आनन्दी,
म्हणो कोणी खुळा फन्दी, महात्मा तोच या कालीं.
कराया राष्ट्रसंशुद्धी पदे सत्याग्रहें युद्धीं,
न सत्तेला विकी बुद्धी महात्मा तोच या कालीं.
ऋताचा घेऊनी ताणा अहिंसेचा जुना बाणा,
विणी स्वाराज्य खादी जो महात्मा तोच या कालीं.
२७ एप्रिल १९२१
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP