मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
जीवघेणी काय लीला ही तुझी ...

गज्जलाञ्जलि - जीवघेणी काय लीला ही तुझी ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


जीवघेणी काय लीला ही तुझी !
दाव दासाला दया काही तुझी.

कौतुकें केली किती ती चौकशी -
ही ऊपेक्षा मागुनी पाही तुझी !

दों दिसांचा पूर कीं ओढयास ये -
ओढ गेली ऐक अप्ताहीं तुझी,

घ्येय तेव्हा मीच तूते भासलों
धुण्डितां द्दष्टी दिशा दाही तुझी.

काय ऐका चुम्बनाने पालटे
वृत्ति ऐकाकी रसग्राही तुझी ?

शुष्क पुष्पासारखा मी यापुढे,
वायुवत वृत्ती सदोत्साही तुझी.

प्रेम तें काव्यात्म गेलें लोपुनी,
लोपली सामान्य मायाही तुझी ?

अर्ज केला मी किती वेळा तुल,
दाद घेऊना अलेजाही तुझी.

हिण्डणारा मी न दारोदार गे,
प्रेम तूझें भाकतों, द्वाही तुझी,

ऐरव्ही राजा स्वत:चा मी असें
स्वेच्छया मानूनि दिल्शाही तुझी.

२८ एप्रिल १९२७


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP