मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
कुणापाशी अता मीं प्रेम मा...

गज्जलाञ्जलि - कुणापाशी अता मीं प्रेम मा...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


कुणापाशी अता मीं प्रेम मागावें ?
कुणाला चोरटें हें दुक्ख साङगावें ?

गमे मी ऐकला या लोकसम्मर्दीं,
जिवाचा कोण्डमारा ही करी गर्दी.

स्वत:चीं मी स्वताशी गुङगतों गाणीं.
मुकी लोकांमधे माझी पडो वाणी.

नको ते शब्द ! झाले द्वाड ते भारी,
अनर्थाच्या रहाती हाय शेजारीं !

कळे श्वासांतुनीही स्पष्ट जें तूते
कशाला द्वाड शब्दांनी निवेदूं तें ?

थिजावें का वसन्तीं जीविताच्या मीं ?
जळावें का मृगाक्षी, नन्दनारामीं !

खरें तें प्रेम केलें ना तुवां मागे ?
दिलेलें घेतलें मागूनि तू कां गे ?

खुलेना दोनदा हृत्पुष्प हें जन्मीं,
तुझी लीला ! - बुडालों सर्वथा अन मी.

जून १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP