गज्जलाञ्जलि - केला पद्यप्रपञ्च हा कष्टा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
केला पद्यप्रपञ्च हा कष्टाने,
यावें मनिंचें कष्टाने का गाणें ?
गोळा केलीं न हुर्मुजी मोत्यें कां ?
शिम्पा धरिती काय करीं शाहाणे ?
टीका असली करीत कोणी हसतो,
त्याचा न मला शब्द परन्तू डसतो,
कुम्भ ऐराणी घाटाचे मीं घडिले,
ठेवो यांच्यामघे स्वताचा रस तो.
सादी - हाफिझ बुल्बुल ते शीराझी,
त्यांना न तिजा गज्जलकारांमाजी,
अन त्यांच्याशी या गण - मात्रा जुळुनी
स्पर्धा करितां ठरेन मी वेडा जी !
हौसेने हें काम परी केलें की
हौसेमाजी कष्ट न कोणी लेखी;
केली झाली तशी कलेची सेवा
काहीहि म्हणा परी स्मरूनी नेकी.
७ नोवेम्बर १९३२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP