गज्जलाञ्जलि - जरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जरि यौवनीं शिरलीस चञ्चल पाऊलीं
गमशी मला परि तू अजूनिहि सानुली,
वघतां सतेज सुवर्ण ऊन्दुमुखीं तुझ्या
रमणीय हेमलताच तू पडते भुली.
कुरळिई तुझी बट ये पुढे निटिलावरी
तिज सारितां किति कौतुकें बघशी मुली !
अपुल्या वयांमधि हें न अन्तर थोडकें,
न बघे परी वय मैत्रिकी शुभ आपुली.
तव नाव सुचवि शान्ति, बण्ड तुझें सदा,
करिशी समान विनोद दावुनि वाकुली.
दिसतां विषाद परी मुखीं कधि माझिया
करिशी सचिन्तच चौकशी जणु माऊली !
तव सङगतींत तरडगती सुख - वीचि गे,
तव भावना बहरूनि होय सदाफुली.
किती दूर मी ? परि दे तुझी स्मृति शान्तता;
मजला पुरे स्मृतिचीहि सौख्यद आऊली.
१९ नोवेम्बर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP