गज्जलाञ्जलि - श्यामाच म्हणूं काय तुला श...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
श्यामाच म्हणूं काय तुला श्यामल पोरी ?
रम्भा परिरम्भांत कशाला हिमगोरी ?
हातांत विळा आणिक डोऊवर भारा,
साक्षात श्रमदेवीच दिसे आज समोरी !
तू फोक ऐजू पातळ, हा झोक बघूनी
केळीस जडे शोक, नुरे मागिल थोरी.
चालींत खुले ताठर ही ऐट पहाडी,
ऐत्फुल्ल ऐरीं सुन्दर सङगीन मुजोरी.
हीं सूचवितीं सोशिक कष्टाळु भलाऊ
नेत्रें गहिरीं भेदक तेजाळ टपोरीं,
साधेच पहा बाहुवटीं वाकरवाळे,
जें सुन्दर जात्या, न लगे त्यांस छचोरी,
हां थाम्ब ! कुठे हारवला हृन्मणि माझा ?
कोणास पचे काय अशी नाजुक चोरी ?
वैकुण्ठ कुठे अन्य, ऐथे तू जर लक्ष्मी ?
मी पाटिलराणा तर तू रान - किशोरी.
काळींत खपूं ये चल अन देवदयेने
होतील सुवर्णापरि हीं काजळ - खोरीं,
विस्तीर्ण तळें पूर्ण जळें, आंत तराया,
रायाहि जणू चौकट ऐन्यास बिलोरी,
छायाळ अशा आम्रतळीं बैसुनि सोडूं -
कार्भारिण तू सुग्रण - तूझीच शिदोरी,
जाशील परी तू तर संसार कशाला ?
लेऊनि फिरावें कफनी, माळ, कटोरी.
२२ ऑक्टोबर १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP