मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
सौभाग्यसुन्दरी, गेलीस कां...

गज्जलाञ्जलि - सौभाग्यसुन्दरी, गेलीस कां...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सौभाग्यसुन्दरी, गेलीस कां त्वरें ?
पाहूं कुठे तुला काव्यात्म अप्सरे ?

ये रङगपञ्चमी, कां गे वियुक्त मी ?
मी कां पडूं तमीं, हृज्ज्योत तू बरें !

अन पुष्पवैभवीं सृष्टी दिसे नवी,
स्वर्गास खेव दे सृष्टि स्वयंवरें.

ही गूढ लागणी तूतेंच साजणी,
हाकारिते वनीं पाही पिकस्वरें.

स्वगींय ताप हा जाळी मला पहा,
आशाच सोडली माझी भिषग्वरें

सञ्जीवनी तुझ्यापाशी असूनिही
जावें मरूनि का मी मोहनज्वरें ?

सौन्दर्यनन्दिनी, तू सर्व जाणशी,
नैष्ठुर्य का तुला शोभे प्रमद्वरे ?

१ सप्टेम्बर १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP