मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
अपार शास्त्रीं रमे म्हणो ...

गज्जलाञ्जलि - अपार शास्त्रीं रमे म्हणो ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


अपार शास्त्रीं रमे म्हणो तो निरर्थ सुक्लिष्ट त तराणे,
रुचे मला हें सदैव साधें खुल्या दिलाचें रसाळ गाणें.

मनांत गाणें स्वयेंच जागे; न सूर मागे, न ताल लागे;
प्रफुल्ल व्हावें नवानुरागें, स्फुरूनि गावे खगाप्रमाणे,

अलङकृतींची जरूर कां ती जिवन्त जेथे स्वरूपकान्ती ?
रसज्ञतेची कशास शिक्षा ? रुची मधूची न कोण जाणे ?

कुणास गोडी विचित्र गीतीं. न भावनेची जरी प्रतीती;
असेंच घेती बघूनि नाणें - कसें ठशाचें, कसें खणाणे.

सभोंवती या प्रचण्ड हाटीं शहाणियांची अलोट दाटी;
गमे बसूनी प्रसून - वाटीं क्षणैक व्हावें जरा दिवाणें

प्रसन्न व्हावें सहानुभावें, स्व -भावरीतप्रबन्ध गावे,
कुणीहि यावें, जरा बसावें - ऊथे कुणाला सदा रहाणें ?

२३ सप्टेम्बर १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP