मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
मी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...

गज्जलाञ्जलि - मी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


मी तुझ्यावरी कवनें गाऊलीं किती रचुनी,
त्यांतलें रहस्य कसें ना कळे तुला अजुनी ?

काव्यरीति तू स्तविशी, गूणदोष दाखविशी,
ठेविशी परी कविशी वृत्ति हाय काय सुनी !

रम्य चारु रूप तुझें ऐक सौख्य दे, न दुजें;
शान्तवी तृषा न परी जेवि अम्बरस्थ धुनी.

तारकाच तू गमशी वा सुधांशुसिन्धु शशी,
मी मनुष्य, तार मशी, मी न देव, मी न मुनी.

गाऊलीं किती कवनें, लोटलीं किती अपनें.
नीट ही पहा अजुनी प्रीति खोल सन्थ जुनी.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP