मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
गडे, नको छळुं आता, सुचे न...

गज्जलाञ्जलि - गडे, नको छळुं आता, सुचे न...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


गडे, नको छळुं आता, सुचे न नाव, ऊखाणा
पहा न्यहाळुनि माझा खटयाळ राजस राणा.

असो नसो कुणि पाशी, ह्से रमे अपुल्याशी,
लबाड चोखित बोटें पडे मजेंत ऊताणा.

पहा कसा टक लावी, कुतूहलस्मित दावी,
तया कळे जणु सारें - खराच बाळ शहाणा !

मुके पटापट याचे कितीहि घ्या न चिडे हा -
सदा फुलापरि तान्हा प्रसन्न गोजिरवाणा.

परन्तु वेळ जहाल्यावरी न गप्प बसे हो !
घरास गर्जुनि सोडी हटेल दावुनि बाणा.

पुढेहि आस असे की प्रभाव दाविल शेखीं -
ऊडेल ऊन्च भरारे जसा हवेंत ससाणा.

अमोल भूषण गेहीं नि खेळणें अमुचेंही,
प्रमोद शुक्तिस वाटे बघूनि मौक्तिक - दाणा.

असेंच भावपटाचें पुढे पुढे विणणें हो,
कुमार त्यांतिल बाणा, नि कोण ओळख ताणा ?

२७ ऑक्टोबर १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP