गज्जलाञ्जलि - सर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
सर्वदा सञ्जीवनी तुझिया स्मितोत्सुक आननीं
वस्तिसूचक दीपिका जशि दाट दारुण काननीं.
प्राण हे मग कां असे डोळ्यांत येऊनि बैसती ?
कां पडे मी संशयाच्या या अभद्र शरासनीं ?
हा असे वर्षर्तु, जीवन होय दुर्मिळ तें परी,
केधवा ऊसळूनि देऊट शान्ति गङगा या रणीं ?
मी अतन्द्रित या निशागीतें करी आराधना.
सुप्त मूकच तू तुझ्या त्या स्वर्गसुन्दर दालनीं.
स्पष्ट विकृत साऊली मम ऐक हो सहचारिणी,
हासुनी हिणवी मला जोत्स्ना अवेळीं श्रावणीं.
चन्द्रिकेंत सुशान्त या हिन्दोल जावा गाऊला.
मेघडम्बर माजवी मल्हार तों माझ्या मनीं.
प्रीतिची ठिणगी असे गारेंतही, न तुझ्या ह्रदीं;
माझिया हृदयीं स्फुरे बघ ती जशी चपला घनीं.
गे ऊषेपरि रागरञ्जित केधवा होशील तू ?
चन्द्रिकेपरि धौत या असशीच सुन्दरता - खनी.
माजुनी हृदयीं अराजक दुर्दशा बघवे न ही;
बैस हृदभद्रासनीं, कर शान्त वादळ साजणी !
५ सप्टेम्बर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP