मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
आनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...

गज्जलाञ्जलि - आनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


आनन्दकन्द लोकीं हा शाहु बाळ - राजा,
पाहूनि यास शाकीं ऊल्लास होय ताजा.

अन्धार गाढ भोती. चिन्ता परी नको ती,
हास्यप्रभेस ओती हा बाळचन्द्र माझा.

हा जातिवन्त छावा, आशेस हा विसावा,
साधूनि दुष्ट दावा दैवा, सुखें अता जा.

हा बन्दिवास याचा राहील का सदाचा ?
हा वीर सङकटांचा ठेवील का मुलाजा ?

स्वत्वास जिङकणारा, राष्ट्रास तारणारा
फोडूनि हाच कारा येऊल राष्ट्र - काजा.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP