मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
लाज जरा, हास जरा, हास तू ...

गज्जलाञ्जलि - लाज जरा, हास जरा, हास तू ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


लाज जरा, हास जरा, हास तू !
लाजव या मत्त गुलाबांस तू !

दर्प अशांचा करण्याला दुरी
सोड तुझे सार्थ मधूच्छवास तू.

तू गमशी शान्तिमयी कौमुदी,
दिव्य ऊषा मूर्तिमती आस तू ?

वारितरङगावर नाचे प्रभा
दाव तसे स्निग्ध सुखोल्लास तू

ऐन्दुकलातुल्य तुझें लाघव -
छे ! द्युतिची तू लहरी, रास तू.

बाहय अलङकार तुला कासया ?
गौर मुली, मङगल आरास तू !

हारित हारीसच येऊल गे
दाखवितां त्यास पदन्यास तू.

मित्रसुता प्रीतिलता का कुणी
बालकविस्फूर्ति चिदाभास तू !

शक्य असे काय तुझी विस्मृती ?
जागविशी आन्तर विश्वस तू.

रूक्ष विरागीहि मनीं तत्क्षणीं,
पालविशी प्रेम निरयास तू.

बोलूं नये शब्द खरा, बोललों,
गे न करी अर्थविपर्यास तू.

मानस तू, मान मला हंस गे,
गे पतिताला शिवकैलास तू !

५ नोव्हेम्बर १९२५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP