मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
किती सृष्टीमधे सौन्दर्य द...

गज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


किती सृष्टीमधे सौन्दर्य देखावे,
परी तेथे न माझें गीत झेपावे.

करी आक्रोश हें रानीं तमीं जेथे
पडे घायाळ आशा प्रीतिच्या घावें.

कुणी ओढूनि याला आणिलें येथे
सफाऊने अरण्यीं देऊनी कावे ?

हवें जीवास तें लाभे रडूनी का ?
सदाच जीव हा वार्‍यावरी धावे

मुखीं घोळे जनांच्या शब्द गीताचा -
परन्तू गूज शब्दाचें तुला ठावें.

न ऐकूं ये तुला, तू ऊन्च शैलाग्रीं -
तिथे दूरान्तरें गोडीच तो पावे.

१ जुलै १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP