मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
व्यर्थ पूर्वी म्हटलें की ...

गज्जलाञ्जलि - व्यर्थ पूर्वी म्हटलें की ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


व्यर्थ पूर्वी म्हटलें की मज दे भेट यमा !
म्हणतों आज, रहा दूर वसे जेथ अमा.

मार्ग सम्पूनि दिसे आज परन्धाम ऊथे,
प्रीतिची ही न मुळी जीवनयात्रा सुगमा.

चन्द्रशाळेंत कशी शान्त सुधा ही विलसे,
आणि येती भरुनी सर्व जिवींच्या जखमा !

हासुनी तू पुसशी, कोण चमत्कार करी ?
पौर्णिमेची न दिसे काय तुला ही सुषमा ?

दे न मानेस असा निर्दयतेने झटका !
पौर्णिमा मृर्तिमती तू, नच पूणेंन्दुसमा !

काय दावी नखरा राग तुझ्या गोल मुखी !
स्पष्ट हो त्याज्य किती ही झिजलेली ऊपमा !

कौमुदीने फुलुं दे मत्त मुदें हीं कुमुदें,
ह्त्सुमाला फुलवी ऐक तुझी चारु कमा.

वैभवाच्या शिखरीं जे बसती ते पुसती, -
घ्येयजीवी तरुणा, तू करिशी काय जमा ?

सुज्ञ हो, काय खुळा हा ! म्हणुनी तुच्छ गणा;
चित्कला ही मिळतां काय हवें आणिक मा ?

तू नको हासुं सखे, काय तरी हा बरळे !
चन्द्रिकेहूनिहि तू ऐकच हृद्नम्य रमा !

२८ जानेवारी १९२६ (१)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP