गज्जलाञ्जलि - सखये, काय करूं मी ? मज का...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
सखये, काय करूं मी ? मज काहीच सुचेना,
तुजवाचूनि मला वाचन वा खेळ रुचेना.
दीर्घसूत्री रजनी घालवितों मोजित तारे,
न सरे ही अजुनी कोठवरी होऊल दैना ?
जरि घूत्कार घुमे हृत्कुहरीं निर्जन आता
ये ऊषे, सूक्त तुझें गातिक गे कोकिळ - मैना.
रुचि त्या दिव्य मुखाची विलसो मन्दिरिं माझ्या,
पार पाङगेल तमींची भितरी संशयसेना.
निजरूपींच जरी तू रुचिरे, रङगुनि जाशी,
घे हृदीं या हृदयाचा सखये, निर्मळ ऊना.
Last Updated : November 11, 2016
TOP