मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
माझ्या हृदयांत तूच राणी !...

गज्जलाञ्जलि - माझ्या हृदयांत तूच राणी !...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


माझ्या हृदयांत तूच राणी !
नाही घडणार बेऊमानी,

ठेवूं किति दीस गूज चित्तीं ?
ये आज अखेर आणिबाणी,

वाढे, न शमे तृषा जिवाची
डोळ्यांतिल हें बघूनि पाणी,

वाटे तुज कां बरें कसेसें
वृत्ती मम पाहुनी दिवाणी ?

दे कान, दुजें न मागतों मी,
गातों तव भक्तिचींच गाणीं

देशील जरी प्रसाद थोडा
गाऊनच कां कधी विराणी ?

आता परि ऐकवीं मला मी
ती तीच पुन्हा पुन्हा कहाणी.

माझ्याविण का अडेल तूझें ?
तूझ्याविण मीच दीनवाणी.

घोटाळत तूझिया सभोती
हिण्डे जिव हा नसे ठिकाणी.

स्वातन्त्र्य तुला, कुठेहि जा तू !
मी दास तुझाच गे हिमानी !

आऊं तुज सोडुनी कुठे मी ?
माझ्या ह्रदयांत तूच राणी !

२१ सप्टेम्वर १९२१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP