गज्जलाञ्जलि - तुजवीण सखे, मज कोणि नसे, ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
तुजवीण सखे, मज कोणि नसे,
प्रतिमाहि तुझीच ह्रदीं विलसे,
मी करीं पूजा तियेची भावपुष्पें वाहुनी,
आणि पुष्पें कोणतीं पूजेस अञ्ची याहुनी ?
परि ती न कधीच बघे हसुनी
भिजवी न कधी मन शान्तिरसें.
सारखा ऊसा अबोला भीववी भक्तास या,
केवि वारावें कळेना व्यापणार्या संशया;
कर तूच दया, हस, वार भया.
बघ खोल हिमीं जिव केवि फसे,
बोल तूझा येऊं दे वासन्त वायूसारखा,
आणि आशेची ऊषा ती फाकुं दे, अन्धार कां ?
प्रणयास वसन्तच रम्य सखा,
मग रङगुनि विश्व कसें विकसे !
मे १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP