मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
हाल काय दासाचे, काळजी न ख...

गज्जलाञ्जलि - हाल काय दासाचे, काळजी न ख...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


हाल काय दासाचे, काळजी न खावन्दा,
मी परी तुझा झालों स्वामिनी, खडा बन्दा,

जन्मभूमि सोडूनि आप्तपाश तोडूनी
देहदुक्ख जोडूनी जाहलों परागन्दा.

ही न शेज पुष्पांची, खाच मात्र काठयाची,
लुप्त हींत झालेल्या शोधितों मनोगन्धा.

तावुनी सुळाखोनी प्रीत घे महाराणी !
खूण अंतरींची घे, दोष देन या फन्दा.

प्रीत ही पतङगाची लाट का अनङगाची ?
ही मिठी भुजङगाची, सर्वनाशि हा धन्दा,

वेळ जाय हा वाया, दाव ऐकदा माया,
सिद्ध आहुती द्याया प्रेमशूर मी खन्दा.

२१ मे १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP