मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
प्रेम कोणीही करीना कां अश...

गज्जलाञ्जलि - प्रेम कोणीही करीना कां अश...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


प्रेम कोणीही करीना कां अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी कां स्वार्थ पोटीं ?

पाहशी की लोक देती सुन्दरींना प्रेम - भेटी;
प्रेम तें सङगीन गुच्छीं; प्रेम तें रङगीन ओठीं.

हेम तू साक्षात सुवर्णे ! बद्ध व्हावें का सुवर्णे ?
धर्मसंस्कारें प्रतिष्ठा य़ेऊनि सौद्यास मोठी.

हृदगुणाला जें अव्हेरी प्रेम तें गे कोठवेरी ?
अन्तराची हो जव्हेरी, फेकुनी दे गारगोटी !

आपल्या त्या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी,
भाळतां कोणास देशी कां न भक्तीची सचोटी ?

प्रीतिची ना भूक लागे ? काय साङगूं मी तुला गे ?
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी.

येऊं दे दारीं भिकारी, भूक घे त्याची विचारीं,
चौतही चाले विचारी, त्यास दे, दूरी न लोटीं.

२२ जुलै १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP