गज्जलाञ्जलि - प्रेमावीण जीवाला कशाचा जी...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
प्रेमावीण जीवाला कशाचा जीवनीं आधार ?
चारी मुक्ति देऊ हें, जिणें यावीण कारागार !
कोणाला न हो बाधा कधीही मूर्तिपूजेची ?
पूजीं मूर्तिला त्या मी जिथे तो भास हो साकार ?
ने हें चञ्चल स्वगीं. जिवाचें मोलही मागे,
सौदा हा नसे किंवा दिखाऊ ऐक शिष्टाचार.
देण्यावाचुनी येथे न ये व्यापार तेजीला,
हा तोटयात नित्याचा, पहा अव्याज हा व्यापार !
चिन्ता कां ऊद्याची ती ? ऊद्या होणार होवो तें !
व्हा आताच दामाजी, लुटीला जाऊं द्या भाण्डार.
जागोमान्तकीं प्रेमें, विरक्तीचा सहारा कां ?
दावी चारु मायेचें रहस्य प्रेम - जादूगार.
वाटो भास हा मिथ्या क्षणाचा दिव्य सौख्याचा,
ने हें स्वप्न जीवाला कटू त्या जागृतीच्या पार.
१८ जून १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP