गज्जलाञ्जलि - भवानी आमुची आऊ, शिवाजी आम...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
भवानी आमुची आऊ, शिवाजी आमुचा राणा,
मराठी आमुची बोली, गनीमी आमुचा बाणा.
मराठयांच्या प्रदेशाचा कणा हा सहयबन्धारा,
कशाचा पारतन्त्र्याला दर्याखोर्यांत या थारा ?
अडाणी मावळे काळे शिपाऊ शूर पाऊचे
ऊभे हे खाम्ब पोलादी मराठी हिन्दुशाहीचे.
अशांचा म्होरप्या सर्जा, म्हणूं द्या त्याजला चुव्वा,
परन्तू शत्रुचा पाया खणूनी हा करी धुब्वा.
निघाला काळ अफ्झल्खां धरूनी पोर आणाया,
पहातां तेज तें दैवी निमाली राक्षमी माया.
करी जो स्वत्व रक्षाया तयारी आत्मदानाची,
भवानी साहय हो त्याला, गति स्वर्गीय मानाची,
शिवाजी दे भवानीला तमाचा पिण्ड दाणीला
पहा हा चन्द्र बीजेचा करूनी दाखवी लीला !
गडींचीं वाजतां भाण्डीं ऊठूनी भाण्डली झाडी,
अनाथा म्लेच्छ सेनेला न सोडी, झोडुनी काढी,
हुडा हा पूर्व वाजूचा पुढारे देत ही ग्वाही -
प्रतापी हिन्दुशाहीची ऐथूनी गाजली द्वाही.
स्वराज्यीं हिन्दवी आता मराठी काळ हा जाणा -
भवानी आमुची आऊ, शिवाजी आमुचा राणा.
३० एप्रिल १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP