गज्जलाञ्जलि - नाही तुझ्या मी पोटया गोळा...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
नाही तुझ्या मी पोटया गोळा परी
“आऊ !’ म्हणूनी हाक मारी वैखरी,
नाही तुझ्या दुग्धावरीही पोसलों,
कोठूनि लागे ओढ ऐशी अन्तरीं ?
स्वप्नींहि नाही पाहिलें बाल्यां तुला,
कां भाव बाल्यांतील हा य़ेऊ बरी ?
गेली तिशी लोटूनि अन मी बाल का ?
कां ऊन वैशाखीं नवी वाहे झरी ?
माझे न केले लाड तू केव्हा, तशी
केली तुझीही मी न केव्हा चाकरी,
आश्वर्य की तू द्दक्पथीं येतां झणी
निश्शब्द पूजा मी तुझी चित्तीं करीं,
सन्तुष्ट मी द्दष्टीप्रसादें तूझिया
तत्काल औदासीन्य माझें तो हरी,
माझें तुझें नातें कधीचें कोठलें ?
ही काय माया, योजना वा श्रीश्वरी ?
माझी मला काही कळेना पात्रता.
तैशीच तूझ्या थोरवीची पायरी.
५ जुलै १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP